सुषमा अंधारे यांची महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आक्रमक भूमिका; 6 जणांची नावे रेकॉर्डवर् घ्यावी म्हणून ठिय्या आंदोलन; गंभीर आरोप

by Team Satara Today | published on : 03 November 2025


फलटण  :  शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी सुषमा अंधारेंनी फलटणमध्ये पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. आणि 6 जणांची नावे रेकॉर्डवर् घ्यावी म्हणून  पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे  यांनी फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. मृत महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी सुषमा अंधारेंनी फलटणमध्ये पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. त्यावेळी एसपी तुषार दोशी भेटले नसल्याने अंधारे आक्रमक झाल्या आणि त्यांनी पोलीस स्टेशन समोरच ठिय्या मांडला. डीवायएसपी खांबे यांनी सुषमा अंधारे यांच्याशी बातचीत केली. यावेळी सुषमा अंधारे यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “मृत महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी तिचं चारित्र्यहनन करण्यात आलं,” असा थेट आरोप अंधारेंनी केला.

 फलटण पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करताना सुषमा अंधारेंनी संताप व्यक्त केला. “जर तपासातील माहिती जाहीर करता येत नाही असं पोलिसांचं म्हणणं असेल, तर रुपाली चाकणकरांनी त्या महिलेचे चॅट्स कसे जाहीर केले? आणि त्यावेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या एसपी तुषार दोशींनी त्यांना का अडवलं नाही?” असा सवाल करत अंधारेंनी दोशींवर थेट चारित्र्यहननाचा आरोप केला. तुषार दोशी हे नावाप्रमाणे वागले आणि त्यांनी मृत डॉक्टरचे ठरवून चारित्र्यहनन केलं का? फलटण पोलीस ठाणे छळछावणी झाली आहे. माझा आक्षेप पोलीस अधीक्षक तुषार दोशींवर आहे. अश्विनी बिद्रे प्रकरणात त्यांनी जे केलं ते अंतरवाली सराटीतही केले. त्यामुळे त्यांच्या तपासावर आमचा विश्वास नाही, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला.

 प्रकरणात मंत्री जयकुमार गोरे आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावरही सुषमा अंधारेंनी निशाणा साधला. “जयकुमार गोरे कोण आहेत त्या महिलेचं चारित्र्य ठरवणारे? आधी त्यांनी स्वतःचं चारित्र्य पाहावं. तपासातील गोष्ट तपास अधिकारीही सांगू शकत नाहीत, मग चाकणकर त्या गोष्टी उघड कशा करू शकतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अंधारेंनी पुढे सांगितले की, “या प्रकरणात ज्यांची नावं आली  त्या सहा जणांची चौकशी करा. डीवायएसपी राहुल धस, एपीआय जायपात्रे, माजी खासदारांचे पीए शिंदे आणि नागटिळक, पोलीस उपनिरीक्षक पाटील आणि मेडिकल अधिकारी अंशुमन धुमाळ. मग या लोकांवर आरोपपत्र का दाखल केलं नाही? पोलिस विभाग त्यांना वाचवत आहे का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खासदार उदयनराजे म्हणतात.. काळजी करू नका, मनोमिलन झालंय; लोकांवर अन्याय झाला तर मी आवाज उठवतो
पुढील बातमी
पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादया नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

संबंधित बातम्या