10:49pm | May 24, 2024 |
सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून सातत्याने अवकाळी पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या विविध ठिकाणी अवकाळी पावसामुळे घरावरचे पत्रे उडून जाणे, गोठ्याची मोडतोड होणे, झाडे उन्मळून पडणे, पिकाची नासाडी होणे, असे विविध प्रकारचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकर्यांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकर्यांच्या नुकसानीचे तालुकानिहाय तातडीने पंचनामे होऊन त्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख सागर रायते, सुनील पवार, रमेश बोराटे, उपजिल्हा संघटक सादिक बागवान, तालुका समन्वयक हरिदास पवार, सुनील मोहिते, शहर प्रमुख रविंद्र भणगे, उप तालुकाप्रमुख आकाश दौंडे इत्यादी यावेळी उपस्थित होते.
निवेदनात नमूद आहे की, अवकाळी पावसामुळे विविध ठिकाणी सातारा जिल्ह्यात शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. रस्त्यावरची मोठी झाडे उखडून पडल्याने वाहतुकीची समस्या तसेच खंडित विद्युत पुरवठा असे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळ्याच्या त्रासासोबत पिण्याच्या व वापराच्या पाण्याची सुद्धा तीव्र टंचाई भासत आहे. शासन स्तरावर नुकसानग्रस्त शेतकर्यांना व नागरिकांना तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |