सातारा, दि. 9 : माहेरवरून तीन लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावत आणि चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा मानसिक छळ केल्याप्रकरणी तिचा पती, सासू-सासरे, दीर यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहिनी अमोल जाधव (रा. खेड, गोकर्णनगर, ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती अमोल जाधव, सासू विमल जाधव, सासरे बाळकृष्ण जाधव व दीर योगेश जाधव (सर्व रा प्लॉट नं ९, मराठा बंगला , श्रीधर कॉलनी, शाहूनगर सातारा ) यांच्यावर हा गुन्हा नोंद झाला आहे. प्राप्त फिर्यादीनुसार सन 2010 ते 8 सप्टेंबर 2025 यादरम्यान सासरच्या मंडळींनी संगनमत करून विवाहितेला माहेरकडून तीन लाख रुपये घेऊन ये असा सातत्याने तगादा लावला. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच विवाहितेच्या दिराने पोलिसात तक्रार दिलीस तर विवाहितेला मुलीसह जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत सातारा शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.
विवाहितेच्या जाचहाटप्रकरणी पती, सासरा, सासू, दिरावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 09 September 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा