सातारा : राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन, सातारा येथे पक्षाच्या विविध सेलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी सुनील काळेकर यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी काळेकर यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
या बैठकीत पक्ष संघटना बळकटीकरणाच्या धोरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडे मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवार असल्याचे नमूद करण्यात आले. सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पुढील आठवड्यात घेण्यात येणार असून, उमेदवारीसाठीचे विहित नमुन्यातील अर्ज पक्ष कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अद्याप अर्ज सादर न केलेल्या इच्छुकांनी तातडीने अर्ज भरून पक्ष कार्यालय, सातारा येथे सादर करावेत, असे आवाहन बाळासाहेब पाटील यांनी केले.
वाई तालुका युवक अध्यक्षपदी संतोष पवार यांची निवड
यावेळी संघटनात्मक नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. सातारा शहराध्यक्षपदी सुनील काळेकर, सातारा शहर उपाध्यक्षपदी सचिन बागल, तर वाई तालुका युवक अध्यक्षपदी संतोष पवार यांची निवड करण्यात आली.
या बैठकीस सरचिटणीस राजकुमार पाटील, दिलीप बाबर, सौ. सुवर्णाताई पाटील, सौ. संगिता साळुंखे (माई), गोरखनाथ नलवडे, साहिल शिंदे, अतुल शिंदे, सचिन जाधव, संजना जगदाळे, वैशाली नेवसे, शुभांगी निकम, उषाताई जाधव, नागेश साळुंखे, किरण चौधरी, निलेश जगदाळे, दयानंद नागटिळक, सुवर्णा पवार, डॉ. प्रियांका माने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.