सातारा : प्रतापसिंह नगर सातारा येथे एकाला कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अनिकेत बापू गायकवाड हे या मारहाणीत जखमी झाले असून त्यांनी सिद्धार्थ मिसाळ वय 19 राहणार प्रतापसिंहनगर यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार दिनांक 29 रोजी सायंकाळी साडेनऊ वाजता गायकवाड हे आपल्या मित्रासोबत नगरातील एका रस्त्यावर बोलत बसले असताना मिसाळ याने फिर्यादीला तुला मस्ती आली आहे का? तू फार का तक्रार करतो असे सांगत त्याच्याशी हुज्जत घातली. पुन्हा थोड्या वेळाने येऊन त्याने कोयत्याने फिर्यादीच्या कानाच्या उजव्या बाजूला मारहाण करून त्यांना जखमी केले पोलीस हवालदार देशमुख अधिक तपास करत आहेत.