खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात सातारा बाजूकडे जाताना शुक्रवारी दुपारी वाहनांची कोंडी झाली होती. यावेळी वाहनांच्या दोन तास रांगा लागल्या होत्या. दरम्यान, सायंकाळी घाटाच्या पायथ्याशी ऑइल टँकर हळूहळू पाठीमागे सरकत उलटल्याचीही घटना घडली.
याबाबत माहिती अशी, की शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शिवशाही बस घाटाच्या चौथ्या वळणावर रस्त्याच्या मधोमध बंद पडली. परिणामी, वाहनांच्या रांगा लागल्या. प्रसंगी जवळपास चार ट्रक, एसटी बस व पाच ते सहा चारचाकी वाहने बंद पडल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.
क्रेनची सुविधा नसल्याने वाहने बाजूला करण्यासाठी महामार्ग पोलिसांना ढकलून ही वाहने रस्त्याच्या बाजूला करावी लागली, तर प्रवाशांनीही बंद पडलेली वाहने बाजूला करण्यासाठी मदत केली. यावेळी महामार्ग पोलिस उपनिरीक्षक प्रकाश घनवट व महामार्ग पोलिस किशोर नलवडे, संतोष कचरे, रवींद्र कचरे, गणेश भोंग, विजय बागल, अविनाश डेरे यांनी इतर वाहनांना वाट करून दिल्याने दोन तासांत वाहतूक सुरळीत झाली.
खंबाटकी घाटात शिवशाही बस बंद पडल्याने झालेल्या वाहतूक कोंडीत अनेक वाहने गरम होऊन बंद पडली. मात्र, येथे क्रेन सुविधा उपलब्ध नसल्याने महामार्ग पोलिसांनाच बंद पडलेली वाहने ढकलून रस्त्याच्या बाजूला करावी लागत आहेत.
त्यामुळे घाट परिसरात क्रेन सुविधा मिळावी, अशी मागणी होत आहे, तसेच पेट्रोलिंग व रुग्णवाहिका सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही वेतन न मिळाल्याने हे कर्मचारी सेवा देत नसल्याचे बोलले जात आहे. परिणामी, सामान्य प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यावर लवकरच उपाययोजना व्हावी, ही मागणी जोर धरू लागली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |