गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं 'संगीत मानापमान'च्या स्क्रीनिंगचं आयोजन

by Team Satara Today | published on : 17 January 2025


गोवा : सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनीत 'संगीत मानापमान' चित्रपट १० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात 'संगीत मानापमान' चित्रपटाच्या स्क्रीनिंगचं भव्य आयोजन केले होते. या स्क्रीनिंगसाठी चित्रपटातील मुख्य कलाकार सुबोध भावे, वैदेही परशुरामी, सुमित राघवन, शैलेश दातार, सुनील फडतरे आणि सुबोध भावे ह्यांची पत्नी मंजिरी भावे उपस्थित होते. 

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'संगीत मानापमान' चित्रपटाचे कौतुक केले. त्यांनी लिहिले की, "चित्रपट बघून खूप छान वाटलं, सिनेमाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडुन खूप खूप शुभेच्छा."

'संगीत मानापमान' या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. संगीत प्रेमींसोबत लहान मुलेसुद्धा या सिनेमाचा आनंद लुटत आहेत. अप्रतिम चित्रीकरण आणि एक से बढकर एक गाणी असा हा संगीतमय चित्रपट 'संगीत मानापमान' १० जानेवारी पासून मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालाय आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य ही करतोय.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ऑटोफॅगी मानवी शरीराची एक नॅचरल आणि स्वत:ला वाचवणारी सिस्टीम
पुढील बातमी
नाशिक-पुणे महामार्गावरील भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू

संबंधित बातम्या