स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनात अव्वल स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्राजक्ता गायकवाडने अनेक मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकताच प्राजक्ताने सोशल मीडियावर एक खास पोस्ट करत चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. अभिनेत्री लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे समजले आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्न करत असल्याच्या बातमीला प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट करत तिचे लग्न ठरले असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा, ठरलं! असा खास कॅप्शन देत प्राजक्ताने ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ताने तिचे खास फोटोही शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने साडी आणि दागिने घातले आहेत. अभिनेत्रीचा संपूर्ण लग्नातल्या वधू सारखा दिसत आहे.
या फोटोंंमध्ये प्राजक्ताने सुंदर साडी, गोल्डन दागिने आणि गळ्यात मोठा हार घातला आहे. तिच्यासोबत घरातील मंडळी आणि नातेवाईकही या फोटोंमध्ये दिसत आहेत. त्यामुळे प्राजक्ताचा साखरपुडा झाला असून या सोहळ्यातील हे फोटो आहेत अशी चर्चा आता रंगली आहे. मात्र प्राजक्ताचा होणारा पती कोण? तो काय करतो? याबाबत प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. परंतु अभिनेत्रीचा होणार नवरा कोण आहे हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
प्राजक्ता गायकवाडने हे फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांसह अनेक मराठी कलाकारांनी अभिनेत्रीचे अभिनंदन केले आहे. फोटोवर कोकण हार्टेड गर्लसह, मेघा धाडे, कार्तिकी गायकवाड, मोनालिसा बागल या कलाकारांनाही कमेंट करत तिचे अभिनंदन केले आहे. शेअर केलेल्या फोटोंमधील प्राजक्ताचा सोज्वळ साज पाहून चाहतेही तिच्या प्रेमात पडले आहेत. तसेच चाहते आता अभिनेत्रीचे लग्नातले फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून मराठी मालिका क्षेत्रात पारदर्पण केले. या मालिकेतील तिची येसूबाईंची भूमिका प्रचंड गाजली. या मालिकेने अभिनेत्रीला ओळख बनवून दिली. अमोल कोल्हे यांच्यासोबत तिने साकारलेल्या या भूमिकेला लोकांनी अशरक्ष: डोक्यावर घेतले. यानंतर तिने अनेक मराठी मालिका तसेच चित्रपटांमध्येही काम केले आहे.