सातारा : शाहूनगर (सातारा) येथे रविवारी दुपारी घराच्या आवारात पाळीव कुत्र्यावर अज्ञाताने छ-याच्या बंदुकीतून फायरिंग केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
सातारा नगरपालिकेच्या प्रभाग 17 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवार उषा जाधव यांच्या घराबाहेरील पाळीव कुत्र्याने हल्ला केल्याने राजकीय द्रेषातून फायरिंग केल्याची चर्चा सुरु आहे. याप्रकरणी जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूनगर येथील रहिवाशी उषा जाधव यांच्या घराबाहेर त्यांचा पाळीव कुत्रा फिरत होता. दुपारी घरातील सर्वजण कामानिमित्त बाहेर गेले असताना अज्ञाताने छ-याच्या बंदुकीने पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्रा जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच उषा जाधव व कुंटुंबियानी घरी धाव घेतली. जखमी कुत्र्याला उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. शेजारी राहण्याच्या सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले. परंतु काहीच आढळून आले नाही. याप्रकरणी पती सुनील जाधव (वय 59) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस हवालदार किशोर जाधव करत आहेत.