आजी माजी सैनिकांच्या पोलीस विषयक तक्रारींसाठी संरक्षण समितीची बैठक संपन्न; विविध तक्रारीचा निपटारा

by Team Satara Today | published on : 14 January 2026


सातारा  : आजी माजी सैनिकांचे तसेच सैनिक विधवा पत्नी, वीरपत्नी वीरमाता यांचे विविध पोलीस विषयक तक्रारीबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी संरक्षण समितीची बैठक पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी  पोलीस अधिक्षक, सातारा यांचे दालनात संपन्न झाली. 

बैठकीस उपस्थित ११ माजी सैनिक/विधवा पत्नी यांचे पोलीस विषयक विविध तक्रारीचा निपटारा त्वरित करण्यात आला.  पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांनी यांनी सर्व माजी सैनिकास आपली तक्रार Citizen portal app (CP Gram) तसेच जिल्हा स्तरावर 112 वर कॉल करून आपली तक्रार नोंदवावी असे मार्गदर्शन केले. सदरहु बैठकीस   प्रविण बर्ग, सहा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा,  रोहिणी शिंदे, तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा, राजकुमार भुजबळ, पोलीस निरीक्षक,  काटकर, पोलीस निरीक्षक,  राहुल खाडे व प्रत्येक तालुक्यातील माजी सैनिक प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीनंतर सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी अध्यक्ष तसेच इतर मान्यवर यांचे आभार मानले व बैठक समाप्त झाली.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सन 2025-26 वर्षातील राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती अर्ज करण्यास मुदतवाढ
पुढील बातमी
कोरेगाव शहरात भरदिवसा बिबट्याचा वावर; शेळीवर हल्ल्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली

संबंधित बातम्या