लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणीच्याच खात्यात जमा

मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांची माहिती

by Team Satara Today | published on : 11 October 2024


सातारा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सातारा जिल्हयामध्ये 28 जुन 2024 पासून सुरु आहे. या योजनेदरम्यान, चालु महिन्यात दि. 9 ऑक्टोबर रोजी सातारा जिल्हयातील कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई (सध्या रा. गोरखपूर ता.जि. सातारा) यांचे मोबाईल क्रमांकावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अनुदान आयसीआयसीआय बँक खाते क्र.6010 वर जमा झाल्याचा मेसेज आला. त्यांनी अनुदानाचे पैसे जमा झाले की नाही, यांची माहिती न घेता थेट प्रसार माध्यमांना माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सर्व कागदपत्रांची पडताळणी करून माहिती घेतली असून हा काही वर्षापूर्वी हा नंबर संबंधित महिला वापरत असल्याने तो तिच्या बॅक खात्याशी लिंक होता. आता हा नंबर सरचिटणीस देसाई हे वापर असून तिच्या लिंक झालेल्या बॅक खात्यात हे पैसे जमा झाल्याचा मॅसेज आला आहे. प्रत्यक्षात देसाई यांच्या बॅक खात्यात हे पैसे जमा झालेली नाही. हे पैसे महिलेच्या खात्यात जमा झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे उपस्थित होते.

 यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन म्हणाल्या, या प्रकरणी चौकशी केली असुन त्यामध्ये नरेश देसाई यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या नारी शक्ती दूत ऍपवर व नवीन पोर्टलवर कोणताही ऑनलाईन अर्ज त्यांचे स्वत:च्या नावाने केलेला नाही. तसेच त्यांचे मोबाईल क्र. 50999 वर फक्त पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेले असुन या मेसेजमधील खाते क्रमांक त्यांचा स्वत:च्या नावाचा नसुन या खाते क्रमांक महिलेच्या नावे असल्याचे दिसून आले.

या महिलेशी संपर्क साधून माहिती घेतली असता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या नारी शक्ती दूत ऍपवर सध्या कुर्ला येथे रहात असलेने मुंबई शहर येथील अंगणवाडी सेविका/मदतनीस यांच्याकडून हा ऑनलाईन फॉर्म भरुन घेतला आहे. फॉर्ममध्ये लग्नानंतरचे नाव, वय, पत्ता, आधार कार्ड यांच्या माहिती नुसार नोंद केलेला आहे. ऑनलाईन फॉर्ममध्ये बँक ऑफ इंडीया या बँकेच्या पासबुक ची नोंद केलेली आहे. परंतु आधार सिंडींग आयसीआयसीआय बॅक खात्याला आहे. तसेच त्या महिलेने सन 2016 साली झिरो बॅलेन्स वर खाते काढलेले आहे. परंतु वर नमुद घ्ण्घ्ण्घ् बँक खातेमध्ये सदर योजनेचे पैसे प्राप्त झालेले आहेत तसेच नरेश देसाई यांचे आयसीआयसीआय बँकेमध्ये गृह कर्ज खाते असुन त्याचा खाते क्रमांक स्वतंत्र आहे. नरेश देसाई यांचे बचत खाते बँकेमध्ये कार्यान्वित नाही.

सदर महिलेचे आधार क्र.580099 सिडींग आयसीआयसीआय बँकेमध्ये देसाई यांचा मोबाईल क्रं. 50999 नमुद आहे. म्हणून देसाई यांचे मोबाईल क्रं. 50999 यांना फक्त मेसेज आलेला आहेत. परंतु शासनाचे सर्व अनुदान रक्कम % हजार 500 हे महिलेच्या आयसीआयसीआय बँकेमधील खाते क्र.6010 या खात्यावर जमा झालेले आहेत. याची खात्री जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. त्यामुळे या योजनेचे कोणतेही अनुदान देसाई याच्या खात्यावर शासनाने जमा केलेले नाही.

सरचिटणीस देसाई यांना काढली नोटीस

प्रसार माध्यमाच्या चॅनलवर प्रसारित केलेल्या व्हिडीओ मधील नरेश देसाई यांच्या मुलाखतीमधील मेसेजबाबत जिल्हा प्रशासनाने खात्री केलेली असून त्यामध्ये कोणतेही तथ्य आढळुन आलेले नाही. त्यामुळे देसाई यांच्या विरुध्द नोटीस काढून कार्यवाही सुरु आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभाची रक्कम संबंधित पात्र लाभार्थी महिलेच्या आधारकार्ड क्रमांकाशी सिडींग असलेल्या बँक खातेवर डीबीटी (डायरेक्ट बेनीफिट ट्रान्सफर) पध्दतीने मंत्रालयस्तरावरुन वर्ग करण्यात आले आहेत. सातारा जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जाची काटेकोरपणे छाननी केलेली केली असून पात्र महिला लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ दिलेला आहे. छाननीअंती अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज कायमस्वरुपी अपात्र केलेले आहेत. सातारा जिल्हयातील सर्व पत्रकांराना विनंती आहे की, बातमी प्रसिध्द करताना पडताळणी करुनच प्रसिध्दी देण्यात यावी.

 कारवाईला सामोरे जाण्याची तयारी

सन 2009 सालापासून माझे खाते आयसीआयसीआय बॅकेत आहे. ते वापरात नाही. त्याचा खाते क्रमांक माझ्या लक्षात नाही. त्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे मॅसेज येऊ लागले. यामुळे मी याची माहिती प्रसार माध्यमांना दिली. 2004 पासून हा मोबाईल नंबर आज अखेर चालु आहे. 2016 ला त्या महिलेकडे हा नंबर असल्याची माहिती मिळत आहे. एरटेल च्या सीम कार्डला रेज नसल्याने मी आयडीया मध्ये वर्ग केला आहे. त्यामुळे माझ्या खात्यावर पैसे आल्याचे मी अनावधानाने सांगितले आहे. मी महिलेवर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. माझा मोबाईल नंबर ती का वापरत आहे? मी बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात आले असे म्हणालो नाही, हे प्रसार माध्यमानी छापले आहे. पैसे आले का नाही हे तपासले नाही. माझा या घटनेशी संबंध नाही. या नोटीशीला उत्तर देणार, कारवाई केली तरी सामोरे जाणार, संपूर्ण कॉग्रेस पक्ष पाठीशी आहे, अशी माहिती सातारा जिल्हा कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुजलाम, सुफलाम माण-खटाव स्वप्नपूर्तीच्या दिशेने
पुढील बातमी
दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक व शाही सीमोल्लंघन सोहळ्यामुळे शहरातील वाहतुकीत बदल

संबंधित बातम्या