शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून आयोजित रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद : ५०० जणांनी केले रक्तदान

by Team Satara Today | published on : 25 February 2026


फलटण : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान फलटण शाखेच्या माध्यमातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त येथील महाराजा मंगल कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिरास फलटण शहर व तालुक्यातील नागरिक स्त्री-पुरुष विशेषतः तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ५०० रक्त पिशव्या जमा केल्या आहेत.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान फलटण शाखा आणि फलटण मेडिकल फाउंडेशन संचलित रक्तपेढीच्या माध्यमातून आयोजित या रक्तदान शिबिरास  डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. जोशी यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. डॉ. जोशी यांनी स्वतः रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास डॉ. सदाशिव शिवदे लिखित धर्मवीर छ. संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावरील पुस्तक रक्तदाते व शिवप्रेमींना भेटी दाखल देण्यात आले.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान फलटण शाखेच्या माध्यमातून फलटण शहरात वर्षभर विविध कार्यक्रम उपक्रमांचे आयोजन करण्यात येते त्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एसटी बस स्थानकालगतच्या पुतळ्याची नित्य पूजा व आरती करण्यात येते. प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रतिवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या धारातीर्थ गडकोट मोहिमेत येथील तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत असतो त्याचप्रमाणे प्रतिवर्षी शहरात रामनवमी उत्सव तसेच संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या येथील वास्तव्या दरम्यान वारकरी व भाविकांसाठी अन्नदानाचा उपक्रम तसेच प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी गड संवर्धन मोहिमेचे आयोजन केले जाते दीपावली पाडव्याच्या दिवशी दीपोत्सव तसेच शिवकालीन युद्ध कलेचे (लाठी काठी शिबिर) मार्गदर्शक शिबिर आयोजन करण्यात येत असल्याचे यानिमित्ताने निदर्शनास आणून देण्यात आले.


    शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान फलटण शाखेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिरासह अन्य उपक्रम मोठ्या उत्साहात आणि शिस्तीने पार पाडण्यात येतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांचा सहभाग असतो फलटणकरांसाठी हे सारेच उपक्रम प्रेरणादायी आहेत.





लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोळकी मारहाणप्रकरणी संबंधितावर कारवाई करा ; सौ. नीलम पवार यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

संबंधित बातम्या