सातारा : शिवसागर जलाशयावर मुनावळे ता. जावली येथे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रयत्नातून जागतिक दर्जाचे केंद्र सुरु करण्यात आले आहे. दरम्यान हे जलपर्यटन केंद्र विकसित करून येथे उच्चतम दर्जाचे वॉटर स्पोर्ट्स सुरु झाले पाहिजे त्यासाठी वाढीव निधी मिळावा यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा सुरु होता. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुरा
पर्यटनवाढ यासह स्थानिकांची व्यवसायवृद्धी आणि रोजगार निर्मिती या हेतूने आ. शिवेंद्रसिंहराजेंनी अभ्यासपूर्ण पाठपुराव्यातून मुनावळे येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन केंद्र राज्य शासनाकडून मंजूर करून घेतले होते. या केंद्राचा उदघाटन सोहळा ९ मार्च २०२४ रोजी मुंख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला होता. दरम्यान, मुनावळे जलपर्यटन केंद्रावर पर्यटकांच्या सोयीसाठी आवश्यक सोयी सुविधा, बांधकाम व पायाभूत सुविधांची कामे करणे, अत्याधुनिक बोटी व जलपर्यटन केंद्र विकसित करणे यासाठी पूर्वी मंजूर असलेला ४५ कोटी ३८ लाख एवढा निधी पुरेशा पडणार नव्हता त्यामुळे या कामांसाठी वाढीव निधी मिळावा अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी राज्य शासनाकडे लावून धरली होती. यासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजेंनी मुख्यमंत्री आणि दोनी उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुरा
मुनावळे जलपर्यटन केंद्रावर वॉटर स्पोर्ट्स सुरु करण्यासाठी ९२ कोटी ४६ लाख
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश; पर्यटन विभागाकडून मिळवली सुधारित प्रशासकीय मान्यता
by Team Satara Today | published on : 14 October 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा