सातारा नगरपरिषदेनजीकच्या पाणी टाकीजवळ सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या गांजा सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 11 January 2026


सातारा : येथील सातारा नगरपरिषदेनजीकच्या पाणी टाकीजवळ सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या गांजा या अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळून आल्याने सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. शुभम सत्यवान नलवडे (मूळ रा. म्निमसोड, ता. खटाव सध्या रा. सातारा एमआयडीसी) असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे. शनिवारी (दि. ९) रात्री सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून पोलिस कर्मचारी सुशांत कदम यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिस फौजदार अनभुले हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नियमांच्या उल्लंघनप्रकरणी सातारा बसस्थानकानजीकच्या एका बिल्डींगमध्ये कॅफेचालकांवर गुन्हा
पुढील बातमी
यवतेश्वर येथील पठाराजवळ सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर कारवाई

संबंधित बातम्या