करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर

by Team Satara Today | published on : 29 November 2025


सातारा : करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल व न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांचे विविध विषयांचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे यासाठी लायन्स क्लब ऑफ  सातारा यांच्या सौजन्याने  मुंबईतील KANTRA INDIA FOUNDATION या कंपनीच्या वतीने 40 टॅब भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

शिक्षण प्रसारक संस्थेचे विद्यमान सचिव तुषार पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच हे साध्य झाले आहे. आजच्या विज्ञान युगामध्ये कॉम्प्युटर, टॅब, मोबाईल यासारख्या आधुनिक साधनांचा वापर शैक्षणिक क्षेत्रामध्ये महत्त्वाचा ठरला आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना टॅब हाताळता यावा, त्याचा वापर विविध विषयांची अधिक माहिती मिळवण्यासाठी करता यावा याच हेतूनेKANTAR INDIA FOUNDATION  या कंपनीने ही अनमोल भेट शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी दिली आहे.

यासाठी सुनील खामकर- KANTAR IT Head ,अभिलाषा वेल्हाळ- Senior Manager KANTAR, अविष्कार वेल्हाळ Manager,Round Robin आणि साताऱ्यातील लायन्स क्लबचे प्रकल्प समन्वयक मनिष आंबेकर यांच्या प्रयत्नांमुळेच हे टॅब उपलब्ध झाले आहेत. यांचा वापर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केला जाणार आहे. या मौल्यवान भेटीबद्दल संबंधित सर्व मान्यवरांचे शिक्षण प्रसारक संस्थेमार्फत आभार व्यक्त करण्यात आले.

या टॅब वितरण कार्यक्रमा वेळी शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा सौ वत्सला डुबल, उपाध्यक्ष  जगन्नाथ किर्दत,  नंदकिशोर जगताप, संस्था सचिव तुषार पाटील, संचालक धर्यशील भोसले, संचालिका सौ. हेमकांची यादव, अभिलाषा वेल्हाळ (Senior Manager,KANTAR), अविष्कार वेल्हाळ (Manager,Round Robin), मा. बापूसाहेब सावंत (विभागीय अध्यक्ष लायन्स क्लब),  प्रभाकर आंबेकर (माजी प्रांतपाल, सायन्स क्लब), मनिष आंबेकर( प्रकल्प समन्वयक लायन्स क्लब), श्रीपतराव पाटील हायस्कूल चे मुख्याध्यापक अमरसिंह वसावे, न्यू इंग्लिश मिडीयम  स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. निलम शिंदे, पर्यवेक्षक यशवंत गायकवाड सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रामोशीवाडी, जाखणगाव परिसरात गांजावर कारवाई ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,. २ लाख ७८ हजारांचा ११ किलो गांजा जप्त
पुढील बातमी
महात्मा फुलेंचे साहित्य श्रेष्ठ दर्जाचे - प्रा. डॉ. विजया पाटील-वाडकर ; संबोधी प्रतिष्ठानच्यावतीने थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत विचार मंथन

संबंधित बातम्या