सातारा : सातारारोड, ता. कोरेगाव येथील एका कंपनीची दोन लाख ४९ हजार रुपये किमतीची चेंबरची ६० झाकणे अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहेत. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात मंगळवारी दुपारी दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विवेक अशोक पिसाळ या साईट इंजिनिअरने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सातारारोड येथील गदगकर हायस्कूलच्या पाठीमागे कंपनीने चेंबरची ६० झाकणे ठेवली होती. अज्ञात चोरट्याने दोन लाख ४९ हजार रुपये किमतीची ही झाकणे चोरून नेली आहेत. चोरीची ही घटना दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार नागराज कदम तपास करत आहेत.