जिह्यात भाजपचे 60 ठिकाणी झेडपीसाठी तर 118 ठिकाणी पंचायत समितीसाठी उमेदवार

by Team Satara Today | published on : 22 January 2026


सातारा : अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस बुधवारी होता. सकाळपासून इच्छूकांनी शक्तीप्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केल्याने अर्ज स्वीकृती केंद्रावर गर्दी झाली होती. सातारा जिह्यात भाजपाने तब्बल 60 ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरले असून पंचायत समितीसाठी 118 ठिकाणी अर्ज भरले आहेत. शिंदे गटाचे नेते एबी फॉर्म वाटून चक्क आजारी पडल्याने माहिती समजू शकली नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाने 18 जिल्हा परिषद गट आणि 26 गणात उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी अजितदादा गटानेही अर्ज मोठया संख्येने भरलेले आहेत. त्यांची आकडेवारी समजू शकली नाही. दरम्यान, अर्ज छाननी दि. 22 रोजी असून दि. 23 ते 27 दरम्यान अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने त्या दरम्यान निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सातारा आणि जावली तालुक्यात भाजपाचे एबी फॉर्म म्हसवे गटातून वसंतराव मानकुमरे, कुडाळ गटातून जयश्री गिरी, कुसूंबी गटातून अर्चना रांजणे, पाटखळ गटातून अॅङ गौरी नलावडे,  लिंब गटातून सर्जेराव सावंत, खेड गटातून संदीप शिंदे, कोडोली गटातून निता बाळासाहेब खरात, कारी गटातून राजू भोसले, शेंद्रे गटातून पूजा मोरे, वर्णे गटातून वैभव चव्हाण, नागठाणे गटातून अजित साळुंखे तर गणासाठी खर्शी बारामुरेतून गोरखनाथ महाडिक, म्हसवेतून रेश्मा पोफळे, कुडाळमधून सौरभ शिंदे, सायगावमधून चारुशिला पवार, आंबेघर तर्फ मेढामधून विजय सपकाळ, कुसुंबीतून पुष्पा चिकणे, शिवथरमधून किशोर शिंदे, पाटखळमधून राहुल शिंदे, लिंबमधून प्रभाकर पवार, कोंडवेतून महेश गाडे, खेडमधून मधू कांबळे, क्षेत्र माहुलीतून स्वाती जाधव, कोडोलीतून रामदास साळूंखे, संभाजीनगरमधून विजया साळूंखे, परळीतून वसंतराव भंडारे, कारीतून शोभा लोटेकर, निनामधून प्रमिला सुतार, शेंद्रेतुन कोमल दळवी, वर्णेतुन साक्षी माने, अपशिंगेतून मानसिंग मोरे, नागठाणेतून राजेंद्र ढाणे, अतितमधून सुषमा जाधव यांना तिकीट दिले असून त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे. दरम्यान, जिह्यात भाजपाचे सुमारे 60 जिल्हा परिषद गटासाठी तर  118 पंचायत समितीसाठी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने 18 जिल्हा परिषद गटातून अर्ज दाखल

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने सातारा, माण, खटाव, कराड, जावली, पाटण या तालुक्यातून 18 जिल्हा परिषदेच्या गटासाठी तर 26 पंचायत समितीच्या गणासाठी उमेदवार दिले असून रिपाईच्या गवई गटाने अपशिंगे गणातून उमेदवार दिला आहे. राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या कोरेगाव, खंडाळा, वाई, फलटण, महाबळेश्वर या ठिकाणी उमेदवार उतरवले आहेत. त्यांची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, सातारा जिल्हा प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत अधिकृत आकडेवारी मिळू शकली नाही.

शिंदे गटाचे नेते एबी फॉर्म वाटून पडले आजारी

साताऱ्यात शिंदे गटाची एबी फॉर्मची जबाबदारी शरद कणसे यांच्याकडे होती. त्यांचे कार्यालय देगाव फाटा येथे असून जिह्यातून शिंदे गटाचे इच्छूक उमेदवार   एबी फॉर्मसाठी पत्ता शोधत शोधत पोहचत होते. एबी फॉर्म घेवून परत अर्ज भरायला जात होते. शरद कणसे यांना फोनवरुन संपर्क साधला असता ते म्हणाले, मी आताच एबी फॉर्म वाटून आलोय. आजारी पडलोय. आता आराम करतोय.  त्यामुळे किती जणांना एबी फॉर्म दिले हे मी आता तुम्हाला सांगू शकत नाही, असे त्यांनी उत्तर दिले. तसेच उबाठा गटाचा सुद्धा नेमके जिल्हा प्रमुख कुठे आहेत या निवडणूकीच्या गडबडीत हे मात्र समजू शकले नाहीत. त्यांनी कोणाकोणाला एबी फॉर्म दिले. कुठे कुठे उमेदवार उभे केलेले आहेत हे समजू शकले नाही.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाबळेश्वर तालुक्यात उमेदवारी अर्जांचा महापूर; अखेरच्या दिवशी ३८ नामनिर्देशन दाखल, राजकीय वातावरण तापले
पुढील बातमी
करंजे नाक्यावर जुगार अड्ड्यावर छापा; ९४० रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त

संबंधित बातम्या