भारत फायनान्स कंपनीच्या फसवणूकप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 18 December 2025


सातारा : कोडोली धनगरवाडी येथील भारत फायनान्शिअल इक्लुजन लि. येथून वेगवेगळ्या ११ जणांनी कर्ज घेतले होते, त्यांच्याकडून तुषार एकाराम नवगिरे (रा. धोतरी, सोलापूर) याने मुदतपूर्व कर्जाची वसूल केलेली रक्कम २ लाख ४३ हजार २८२ रुपये भारत फायनान्स कंपनीमध्ये जमा न करता त्याची अफरातफर करून कंपनीची आणि कर्जदार ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.  याबाबत शरद रामचंद्र माने (वय ३२, रा. कोडोली,धनगरवाडी) यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार येवले करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मतमोजणीचा पहिला निकाल येणार 10:30 वाजता; नगराध्यक्षपदाचा मानकरी कोण ? साताऱ्यात प्रचंड उत्सुकता
पुढील बातमी
प्रतापसिंहनगरात एकास जखमी केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

संबंधित बातम्या