सातारा : अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदरबझार, सातारा येथे महेश अशोक सावंत (वय 28, रा. सोनगाव संमत निंब ता.सातारा) हा गांजा ओढलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.