सातारा : सातारा विकास आघाडीचे कायदेशीर सल्लागार व खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असलेले गोडोली येथील माजी उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर तथा डी.जी. बनकर यांनी पाच वर्षानंतर सातारा नगरपरिषदेच्या कार्यालयात पुन्हा आगमन केले. त्यांच्या या मी पुन्हा येईन... या करिष्म्याने अनेकांचा आवाज दाबला गेल्याची चर्चा सातारा शहरात सुरू झालेली असून, आम्हीच नगरपालिका चालवतो. अशा बाता मारणाऱ्यांना ॲड. डी.जी. बनकरांच्या एंट्रीने चांगलीच चपराक बसली आहे.
सातारा शहर व परिसरातील अनेक घडामोडींचे साक्षीदार म्हणून ॲड. दत्ता बनकर यांच्याकडे पाहिले जाते. कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर त्याला सामाजिक कार्याची जोड देऊन सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका घेतली. साताऱ्यातील अनेकांच्या सुख-दुःखामध्ये धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आज सातारा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे होत असताना त्रीशंकु भाग व निम शहरात सुद्धा त्यांनी अनेक विधायक उपक्रम राबवले आहेत. एवढेच नव्हे तर, सातारा जिल्ह्यात फक्त सातारा शहरांमध्ये तीन मजली सातारा शहर पत्रकार संघाची इमारत उभी करून खऱ्या अर्थाने पत्रकार बांधवांचा गौरव केलेला आहे. आज या इमारतीमध्ये अनेक व्याख्यानमाला, कार्यशाळा आणि पत्रकार परिषदा होत आहेत. याचा खरा पाया निर्माण केला तो ॲड. डी.जी बनकरांनीच. त्यामध्ये दैनिक पुढारीचे निवासी संपादक तथा अधीस्वीकृती समितीचे पुणे विभागीय अध्यक्ष हरिष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी त्याचबरोबर माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे आणि ॲड.डी.जी बनकर यांचे नाव घेतल्याशिवाय या वास्तूचा इतिहास पुढे जाऊ शकत नाही.
सातारा नगर परिषदेच्या कार्यालयाला ॲड.डी.जी बनकर यांनी भेट दिली आणि तो एक बातमीचा विषय ठरला. कारण गेले अनेक वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्यामुळे बऱ्याच वेळा इच्छुक कार्यकर्त्यांची निराशा झाली होती. पण त्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीय आरक्षण जैसे थे ठेवून विशेषता महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुका चार महिन्यात घेण्याचा निर्णय घेतला. खरं म्हणजे या निर्णयात आणि ॲड. डी.जी बनकर यांच्या नगरपरिषदेच्या एंट्रीमुळे कायदेशीर लढाई जिंकल्याचा सार्थ अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला. कदाचीत नाच रे मोरा नगरपालिकेच्या वनात, असा मनस्वी आनंद भावी नगरसेवकांना झाला असेल. तसं पाहिलं तर, सातारा शहराच्या विकासामध्ये खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनोमिलनामुळे अडथळ्याची शर्यत बंद झाली आहे. आता मनो मिलनाच्या माध्यमातून कार्यक्षम व सक्षम नगरसेवक सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत विजय होऊन बहुदा नव्या इमारतीत दाखल होतील आणि योगायोग म्हणजे ही नवीन इमारत ही जिल्हाधिकारी कार्यालयापासून जवळ असल्यामुळे खऱ्या अर्थाने ॲड.डी.जी. बनकर यांच्या दमदार एंट्रीने अनेक इच्छुक भावी नगरसेवकांसाठी नवीन इमारतीत जाण्याचे दरवाजे उघडण्याची चर्चा सुरू झाली आहे.