03:56pm | Nov 18, 2023 |
सातारा : मराठा समाज आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचा दाैरा सुरू असून शनिवारी साताऱ्यातील सभेपूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालसमोरील उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करत क्रेनद्वारे मोठा हार घालण्यात आला. तर या भेटी दरम्यान, आयोजकांनी आरक्षणासाठी सातारचे दोन्ही राजे आपल्यासोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी जालना जिल्ह्यात उपोषण सुरू केले होते. त्यावेळी राज्य शासनाने जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा करुन आरक्षण देण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घेतले. पण, आरक्षणासाठी त्यांनी २४ डिसेंबरपर्यंत शासनाला मुदत दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी राज्यभर दाैरा सुरू केला आहे.
शनिवारी ते सातारा शहरातील सभेसाठी आले होते. यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या मराठा समाजबांधवांच्या साखळी उपोषणाला भेट दिली. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच क्रेनच्या सहाय्याने भला मोठा हार त्यांना घालण्यात आला. उपोषणकर्त्यांची भेट घेतल्यानंतर आयोजकांनी सातारा जिल्ह्यातील आंदोलनाची माहिती जरांगे-पाटील यांना दिली. तसेच सातारचे दोन्ही राजे आरक्षणाबाबत आपल्यासोबत असल्याचेही सांगितले. यावेळी समाजबांधवांनी ‘जय भवानी, जय शिवाजी... एक मराठा, लाख मराठा.. अशी जोरदार घोषणाबाजी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणस्थळ भेटीनंतर मनोज जरांगे-पाटील हे पोवई नाक्यावर गेले. याठिकाणी समाजबांधवांनी फुलांच्या वर्षावात जरांगे-पाटील यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर ते सभास्थळाकडे रवाना झाले.
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
सफाई मजदूर कॉंग्रेसची जिल्हा रुग्णालयात गांधीगिरी |
साताऱ्यात अंगणवाडी सेविकांची निदर्शने |
भाजपा कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष |
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला जिल्ह्यातील मतदार नोंदणीसह विविध विषयांचा आढावा |
सातारच्या श्लोक घोरपडेने रोवला मानाचा तुरा |