मुंबई : शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपण्याच्या काही वेळ अगोदर हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवले होते. या प्रकरणी राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चौकशीला सुरुवात केली आहे. हेलिकॉप्टरने नेमकं कुणी आणलं? त्यात कोण होतं? कोणत्या उमेदवारांसाठी AB फॉर्म मागवण्यात आले? त्याला किती खर्च आला? यासह अन्य बाबींची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे हे प्रकरण शिंदेसेनेच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या एबी फॉर्म प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नाशिकच्या उमेदवारांसाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपण्याच्या काही वेळ अगोदर हेलिकॉप्टरने हे एबी फॉर्म पाठवणे शिंदे सेनेच्या अंगलट आले आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाने आपल्या उमेदवारांसाठी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून विचारणा होताच जिल्हा प्रशासनाकडून चौकशीला सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनाकडून एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे.
संबंधित चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाईचे स्वरूप निश्चित केले जाईल. 29 तारखेला अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीच्या काही वेळापूर्वी शिंदे सेनेकडून एबी फॉर्म देण्यात आला दिंडोरी येथील धनराज महाले आणि देवळालीच्या राजश्री अहिरराव यांना एबी फॉर्म देण्यात आला असता. त्यामुळे या याचिकेची राज्यभर चर्चा आहे.
दरम्यान, 22 ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. यंदाच्या निवडणुकीत जागा वाटपावरुन नाराजी नाट्य झाले आणि अनेक पक्षांतील नेत्यांकडून बंडखोरी करण्यात आली. महायुतीमध्ये देखील अनेक ठिकाणी बंडखोरी झाली.
महायुतीच्या दुसऱ्या पक्षाला जागा देण्यात आली असताना त्याठिकाणी अर्ज भरण्यात आले. उमेदवारी अर्ज वेळेत भरण्यासाठी सर्वच इच्छुकांनी धावपळ केली होती. अशा स्थितीत शिंदे यांनी नाशिकमधील त्यांच्या पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना शेवटच्या क्षणी हेलिकॉप्टरने पाठवलेले एबी फॉर्म पाठविला. नाशिक देवळाली आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघात मोठी बंडखोरी पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात याची जोरदार चर्चा रंगली आहे.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |