सातारा : अज्ञात चोरट्याने जरंडेश्वर नाका येथून चार चाकी गाडीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 ते 22 जुलै दरम्यान खेड मळवी, जरंडेश्वर नाका, सातारा येथील दत्तात्रय संपत पिसाळ यांची राहत्या घरासमोर पार्क केलेली 70 हजार रुपये किंमतीची टाटा इंडिका गाडी क्रमांक एमएच 11 BD 5057 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक सावंत करीत आहेत.
चार चाकी गाडीची चोरी
by Team Satara Today | published on : 23 July 2023

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा