आर्थिक फसवणूकप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

वाई पोलीस ठाण्यात गुन्हा; 3 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक

by Team Satara Today | published on : 15 September 2025


सातारा, दि. १५ : ऊस तोडणीकरता मजूर पुरवतो असे सांगून एकाने शेतकऱ्याची 3 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा वाई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

सुनिता मधूकर ससाणे (वय 47 रा. केंजळ) यांनी वाई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 8 ऑगस्ट 2023 ते दि. 30 सप्टेंबर 2023 दरम्यान कैलास पांडया पाडवी (वय 33, रा. मध्यप्रदेश) याने ऊस तोडणी व भरणी करण्यासाठी 12 पुरुष व 12 महिला मजूर पुरवतो असे सांगून 100 रुपयांच्या स्टॅम्पवर करार नामा अॅङ जगदीश पाटणे यांच्या नोटरी कार्यालयात केला होता.

त्याचवेळी एक जोडी 70 हजार रुपयांप्रमाण 70 हजार रुपये रोख दिली. त्यानंतर सुनिता ससाणे यांचे पती मधूकर आणि मावसदीर राजेंद्र ननावरे हे कैलास पाडवीच्या घरी गेले होते. तेव्हा 1 लाख रुपयांचा चेक दिला. त्यानंतर दि. 30 सप्टेंबर रोजी 1 लाख 50 हजार रुपयांची एनईएफटी केली. त्यानंतर कैलास केंजळ येथे आला. त्याने अजून पैसे लागतील असे सांगून 50 हजार रुपये घेतले अशी सुमारे 3 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याचा तपास हवालदार सपकाळ हे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सेव्हन स्टारच्या पार्किंगमध्ये युवकास कोयत्याने मारहाण
पुढील बातमी
बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडीपारीच्या आदेशाचा भंग

संबंधित बातम्या