सातारा : सातारा शहरासह तालुक्यातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे मारून पोलिसांनी तिघांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 रोजी सातारा शहरातील सेव्हन स्टार बिल्डिंग समोरील भाजी मंडई येथे निकेतन किशोर पिसाळ रा. रघुनाथपुरा पेठ, सातारा हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 1190 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत, सातारा शहरातील करंजे नाका परिसरातून शेखर राजाराम परदेशी रा. पाडळी, पोस्ट सातारारोड, ता. कोरेगाव यांच्याकडून 1070 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
तिसऱ्या घटनेत, पाटखळ, ता. सातारा गावच्या हद्दीतून राकेश केशव माने, राहणार डबेवाडी, ता. सातारा यांच्याकडून 1070 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.