सातारा : येथील राजवाडा परिसरातील श्री पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर ट्रस्टला भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार डॉ.अतुल बाबा भोसले तसेच कराडचे आमदार मनोज घोरपडे आणि माजी आमदार आनंदराव पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सातारा येथे त्यांचे आगमन झाले होते, त्यावेळी त्यांनी सहस्त्रचंडी दुर्गा माता याग सोहळ्यात उपस्थित राहता आले नाही, तरीही आवर्जून मंदिर परिसराला ही सदिच्छा भेट दिली. यावेळी मंदिराच्या वतीने आयोजित केलेल्या वसुबारस पूजनातही त्यांनी सहभाग घेतला. मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची आरती करून या सर्व मान्यवरांचा सत्कार ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन करण्यात आला.
यावेळी नगरसेवक भाऊ जांभळे यांचे सह मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष राजेंद्र साळुंखे ,सचिव शिवाजी उर्फ प्रशांत तुपे ,उपाध्यक्ष शिवाजी भोसले .कोषाध्यक्ष प्रेमचंद पालकर ,दिलीप शास्त्री आफळे यांचेसह हरीष शेठ, विनायक चिखलगे तसेच सर्व विश्वस्त व कार्यकारणी सदस्य ,हितचिंतक ,व्यवस्थापक सोळके, निखिल चव्हाण ,विशाल चव्हाण, वैभव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मंदिराच्या कार्याची माहिती धनंजय देशमुख यांनी या मान्यवरांना दिल्यावर खऱ्या अर्थाने ऐतिहासिक सातारा या शाहूनगरीच्या राजधानीचे वैभव असणारा हा पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर ट्रस्ट उपक्रम हा खरोखरच स्तुत्य आणि खऱ्या अर्थाने आपली ब्रीदवाक्य साजेसे करणारा असा आहे. आम्ही संस्कृती जपतो ,आम्ही संस्कृती टिकवतो. या उद्देशाने हा एक अतिशय चांगल्या उपक्रमांचा घेतलेला वसा सर्वच गणेश मंडळे आणि विविध सामाजिक सेवा करणाऱ्या ट्रस्ट ना आदर्श पूर्ण असा आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंदिर ट्रस्टच्या विविध उपक्रमामध्ये आम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी होतच आहोत तसेच मंदिराच्या पुढील भावी संकल्प आणि प्रकल्पांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा चिंततो अशा शब्दात डॉ. अतुल भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
यावेळी आमदार मनोज घोरपडे यांनीही मंदिराच्या सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक करून अपेक्षित आणि नियोजित अशा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या शंभूसृष्टी आणि गोशाळा प्रकल्पासाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.