… खळखळणाऱ्या पाण्यातून बाळासाहेबांचे नाव उजळेल : नितीन बानगुडे-पाटील, फडतरवाडी येथे जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेचे जलपूजन

by Team Satara Today | published on : 05 December 2025


पुसेगाव :  कायम दुष्काळी भाग असणाऱ्या खटाव- माणसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या भागाचे नंदनवन करण्यासाठी जिहे- कठापूर योजनेची निर्मिती केली. गेल्या काही दिवसापूर्वी या योजनेचे पाणीपूजन लोकप्रतिनिधीनी केले पण यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा साधा उल्लेखही केला नसला तरी खळखळणाऱ्या पाण्यातून बाळासाहेबांचे नाव उजळेल, असा टोला कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष, शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांनी लोकप्रतिनिंधींना लगावला.

फडतरवाडी, ता . खटाव येथे जिहेकठापूर उपसा सिंचन योजनेच्या जलपूजन व दीप महोत्सव निमित्त कृष्णा खोरे विकास महामंडळ माजी उपाध्यक्ष बानगुडे-पाटील बोलत होते.  यावेळी शिवसेना उपनेते छायाताई शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख शेतकरी सेना प्रताप जाधव, उपजिल्हाप्रमुख दत्ता नलवडे,  तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे,  तालुका प्रमुख रमेश बोराटे, तालुकाप्रमुख संजय नांगरे, भानदास कोरडे, संघटक यशवंत जाधव ,अर्जुन मोहिते शाखाप्रमुख असलम शिकलगार, उपतालुकाप्रमुख आमिंन आगा,  पुसेगाव शहर प्रमुख आकाश जाधव, महिला आघाडी तालुकाप्रमुख अनिता काळे, सत्वशीला जाधव,मुगुटराव कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत योजनेची पाहणी करण्यात आली व पूजन करण्यात आले.

औपचारिक दृष्ट्या योजनेची कळ दाबून  पाणी सुरू करण्यात आले. पाण्याची ओटी भरण व दीपोत्सव व पाणी पूजन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व तालुक्यातील शेतकरी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी बोलताना नितीन  बानुगडे पाटील यांनी जिहेकठापूर योजनेचा इतिहास सांगितला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान किती आहे हे सांगितले. जरी लोकप्रतिनिधींनी बाळासाहेब ठाकरे यांचा नावाचा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी उल्लेख केला नसला तरी खळखळंणाऱ्या या पाण्यातून बाळासाहेबांचे नाव उजळेल असे म्हणाले. युतीच्या काळात योजना कार्यार्णवी झाली. बाळासाहेब ठाकरे यांनी या योजनेत विशेषता लक्ष देऊन या योजनेच्या काळात भरून निधी टाकला आहे. योजना 80 टक्के काम पूर्णतः गेले व सरकार गेले. पुन्हा  सरकार आले .मुख्यमंत्री कार्यलयात उद्धव  ठाकरे यांनी या योजनेस प्रशासकीय मान्यता मिळवून दिली व केंद्राकडून मोठा निधी या योजनेस आणला. आज हे पाणी शेतकऱ्याच्या बांधावर येऊन पोहोचले याचा मोठा आनंद आहे. आमच्या आजपर्यंत या योजनेसाठी विविध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना आहे व त्याचा अभिमान आम्हास आहे त्यांच्या आंदोलनाला यश आज मिळाले आहे. विशेषता त्यांचेही अभिनंदन केले . यावेळी छायाताई शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले  व या योजनेच्या पाण्याची ओटी भरण ताईच्या हस्ते करण्यात आले यशवंत जाधव यांनी आभार मानले.

आंदोलनकर्त्यांचा मातोश्रीवर सन्मान होणार

नितीन बानगुडे- पाटील यांनी या कार्यक्रमा वेळी आजपर्यंत या आंदोलनात जे शिवसैनिक सहभागी झाले. या आंदोलनादरम्यान केसेस, तुरुंगवास भोगला या सर्वांचा सन्मान उद्धव ठाकरे यांच्या शब्बासकीने होणार  आहे .महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख अनिता काळे यांनी या आंदोलनादरम्यान वडूज पोलीस स्टेशन येथे प्रताप जाधव यांच्या समवेत पाच दिवस तुरुंगवास भोगला, त्यायाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पांगरखेल ग्रामस्थांनी बांधला श्रमदानातून वनराई बंधारा; समृद्ध ग्राम योजनेत अग्रेसर राहण्याचा निर्धार
पुढील बातमी
नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा निकाल 21 डिसेंबरलाच लागेल यावर शिक्कामोर्तब; नागपूर खंडपीठाच्या निकाल

संबंधित बातम्या