पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विहे येथील लक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे वास्तव्यास असणार्या आनंदराव गणपत मोरे यांच्या घरामध्ये शनिवार दि.28 रोजी रात्री चोरी झाली. यामध्ये चोरट्यांनी दाराची कडी कटावणीने तोडून घरात प्रवेश केला. घरात कोणीच नसल्यामुळे चोरट्याने घरातील कुलूप बंद असणारे कपाट कटावणीने खोलून त्यामधील साडेआठ तोळे सोने व वीस हजार रोख रक्कम लंपास केली.
कपाटातील व घरातील इतर वस्तू अस्ताव्यस्त फेकल्या. शनिवारी रात्री अनेक ठिकाणी चोरीचा प्रयत्न करत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये निदर्शनास आले आहे. यामध्ये आणखीन दोन ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. चोरट्यांच्या हातामध्ये कुर्हाड, कटावणी दिसून येत असून त्यांनी अनेक ठिकाणी बिनधास्तपणे घरांची पाहणी केली आहे. त्यानंतर लक्ष्मी मंदिरामागे असणार्या बंगल्यामध्ये या चार चोरट्यांनी घुसून ही चोरी केली. सदरची घटना रविवारी सकाळी शेजार्यांना निदर्शनास आल्यानंतर पोलिस पाटील यांना कळविण्यात आले. त्यानंतर रविवार दि.29 रोजी सकाळी दहा वाजता पोलिसांनी श्वान पथक व फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून तपास सुरू केला. मल्हारपेठ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मछले यांनी या चोरीबाबत तपासासाठी दोन टीम तैनात करणार असल्याचे सांगितले असून याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
पाटण : पंढरपूरच्या वारीला गेलेल्या दाम्पत्याच्या घरी घरफोडी करून बंद घरातील आठ तोळे सोने व वीस हजार रूपयाची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. विहे (ता.पाटण) येथे शनिवार दि.28 रोजी रात्री ही घटना घडली. दरम्यान, चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून तपासाला गती येणार आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव समारोप उत्साहात साजरा
January 17, 2026
विषारी औषध प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू
January 17, 2026
साताऱ्यात मंगळवार पेठेतून २१ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार
January 17, 2026
सातारा शहरात तीन दुकाने फोडून ७४ हजारांची रोकड लंपास
January 17, 2026
४० हजार रुपये किमतीच्या २०० किलो वजनाच्या अल्युमिनियम तारेची चोरी
January 16, 2026
सातारा एमआयडीसी व यशोदानगर येथून दुचाकी वाहनांची चोरी
January 16, 2026