सातारा : बेकायदा दारु विक्री प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बेकायदा दारु विक्री प्रकरणी स्वप्नील सतीश कदम (वय 32, रा.मंगळवार पेठ, सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 1120 रुपये किंमतीच्या 16 दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.