सातारा : अज्ञात मोटरसायकलच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 डिसेंबर 24 रोजी चंदन नगर सातारा येथील सातारा-देगाव रस्त्यावर तेथीलच प्रकाश विष्णू भोसले हे पायी चालत असताना एका दुचाकीने त्यांना जोराची धडक दिल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून अज्ञात मोटरसायकल स्वारावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भालेकर करीत आहेत.
अज्ञात मोटरसायकलच्या धडकेत एकाचा मृत्यू
by Team Satara Today | published on : 16 January 2025