सातारा : सुमारे 35 हजारांच्या फसवणूक प्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एसटी स्टँड, सातारा येथे सिंधुताई प्रकाश भोसले रा. तारगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा यांना अज्ञात महिलेने एसटी स्टँड मध्ये चोर खूप आहेत. तरी तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून द्या, मी ते तुम्हाला रुमालामध्ये बांधून देते, असे म्हणून भोसले यांचे सुमारे 35 हजारांचे मंगळसूत्र घेऊन अनोळखी महिला निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत.
सुमारे 35 हजारांच्या फसवणूक प्रकरणी अज्ञात महिलेवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 27 February 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा