कराड, दि. 5 (प्रतिनिधी) - मुलीचा इन्स्टाग्राम आयडी न दिल्याच्या रागातून फैजान फैयाज बारगीर (वय 15, रा. दौलत कॉलनी, शनिवार पेठ, कराड) याच्यावर मुजावर कॉलनी चौकात मंगळवारी (दि. 4) रात्री 10 च्या सुमारास चाकूने वार करण्यात आले. याप्रकरणी शहाबाद उर्फ छोटा इस्माईल पठाण (वय 30, रा. मुजावर कॉलनी, कराड) आणि एका अल्पवयीन मुलावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फैजान हा मंगळवारी रात्री हा घरात असताना, मुजावर कॉलनीतील अल्पवयीन मुलाने 10 च्या सुमारास फैजानच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शिवीगाळीचे मेसेज पाठवून, तू चौकात ये तुला दाखवतो, असा मेसेज केला. फोन करून फैजानला मुजावर कॉलनीतील चौकात यायला सांगितले. त्यामुळे फैजान हा चौकात गेला असता, अल्पवयीन मुलाने त्याच्याकडे एका मुलीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा आयडी मागितला. फैजानने आयडी देण्यास नकार दिल्याने, चिडून जाऊन संशयित अल्पवयीन मुलगा व शहाबाद उर्फ छोटा पठाण यांनी फैजानच्या डोक्यात, छातीवर, पाठीवर आणि डाव्या हातावर चाकूने वार केले. यामध्ये जखमी झालेल्या फैजानवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक मगदूम तपास करत आहेत.