सर्पदंशामुळे एकाचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 07 November 2024


सातारा : सर्पदंशामुळे एकाचा मृत्यू झाल्याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सरपण गोळा करत असताना राजू सुखदेव भिल्ल (वय 41, रा. अपशिंगे, ता. सातारा, मूळ रा. जि. धुळे) यांना सर्पदंश झाला. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसी भोसले यांनी खबर दिली आहे. पोलीस हवालदार म्हेत्रे तपास करत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राहत्या घरातून आई, मुलगी बेपत्ता
पुढील बातमी
दारुविक्रेत्यांवर कारवाई

संबंधित बातम्या