वाळूच्या ई लिलावाची प्राथमिक फेरी सुरू; प्राधिकरणाच्या अटींनुसार ही प्रक्रिया राबवणार : जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती

by Team Satara Today | published on : 10 December 2025


सातारा : सातारा जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त असलेल्या सात वाळू/रेती भूखंडांचा 2025-26 या वर्षाकरिता लिलाव करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ई-लिलावाची प्राथमिक फेरी घोषित करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार आणि पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाच्या अटींनुसार ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील संबंधित वाळू स्थळांची माहिती, शासकीय दर, अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रे व ई-लिलावाचे संपूर्ण विवरण ुुु.ीरींरीर.र्सेीं.ळप तसेच हीींिं://ारहरींशपवशीी.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक व्यक्ती, संस्था व कंत्राटदारांनी या ई-लिलावात सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

लिलावात कोणतीही बोली शेवटच्या क्षणी नोंद झाल्यास स्वयंचलित प्रणालीद्वारे प्रत्येक वेळी दहा मिनिटांची वाढ देण्यात येईल. इंटरनेट किंवा तांत्रिक कारणांमुळे अडथळा निर्माण झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय जबाबदार राहणार नाही. आवश्यकतेनुसार ई-लिलावातील बोली स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा प्रक्रिया पुढे ढकलण्याचे पूर्ण अधिकार जिल्हाधिकार्‍यांना राहतील. प्रत्येक भूखंडासाठी क्षेत्रफळ, अंदाजे वाळूसाठा, हातची किंमत, इसारा रक्कम व निविदा अर्ज शुल्क आदी बाबी अधिसूचनेत नमूद करण्यात आल्या आहेत.

ई-लिलाव वेळापत्रक - दि. 17 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत

दि. 19 रोजी सकाळी 11 वाजता तांत्रिक लिफाफा उघडणे

दि. 22 रोजी दुपारी 03.00 आर्थिक लिफाफा उघडणे

दि. 24 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 ई-लिलाव प्रत्यक्ष बोली प्रक्रिया

दि. 24 रोजी दुपारी 03.30 ई-टेंडर व बोलींची अंतिम तपासणी

लिलावासाठी एकूण सात वाळू भूखंड कराड, कोरेगाव व माण तालुक्यातील नदीपात्रांमध्ये उपलब्ध आहेत. त्यात कराड तालुक्यात काले व वाठार येथे मांड नदी, कोरेगाव तालुक्यात कवडेवाडी व पिंपोडे खुर्द येथे वांगणा व वसना नदी, माण तालुक्यात शिरगाव, बिदाल व पळशी माणगंगा नदी, या वाळू भूखंडांचा समावेश आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हिंदी शिक्षक महामंडळाच्या राज्यस्तर निबंध स्पर्धेत भिलारच्या बगाडे व पेठच्या शेवाळे प्रथम
पुढील बातमी
९०० कि. मी. चा प्रवास करून 'तारा' चांदोली राष्ट्रीय उद्यानात; सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आणखी एका वाघिणीचे स्थानांतर

संबंधित बातम्या