सातारा शहरातील बस सेवा पूर्ववत करा; नूतन विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांच्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

by Team Satara Today | published on : 30 October 2025


सातारा  :  सातारा शहरातील मध्यम स्वरूपाच्या बसेस पुन्हा सुरू करून सातारा शहरातील जुने बस रूट पुन्हा सुरू करण्यात यावेत, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने करण्यात आली आहे. सातारा  विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने भेट घेऊन नुकतेच अभिनंदन करण्यात आले. शिवसैनिकांनी यावेळी गायकवाड यांच्याशी चर्चा करून विविध स्वरूपाच्या मागण्या केल्या.

महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रणव सावंत,विभागीय अध्यक्ष शहर संघटक सुहास जंगम, विभागीय कार्याध्यक्ष पवन फाळके, निखिल वाघमळे, कोषाध्यक्ष आबा शेडगे, विभागीय संघटक सचिव भूषण पवार, उत्तमराव पवार, वसीम शेख, प्रशांत पवार,किरण जाधव,महेंद्र न्यायनीत , राहुल निकम, एस के बुधवले, श्रीकांत पवार, रविराज बडधरे शैलेश बोडके, सुमित नाईक, आकाश धोंडे इत्यादी उपस्थित होते.

सातारा शहरांमध्ये पूर्वी राजवाडा ते शाहूपुरी राजवाडा ते माहुली रेल्वे स्थानक,राजवाडा ते नागठाणे तसेच ग्रामीण भागातील ज्यादा फेऱ्यांसंदर्भात नियोजन करण्यात यावे याकरता सातारा शहरातून जाऊ शकतील अशा मध्यम स्वरूपाच्या किमान ३० आसनी बसेस सुरू करण्यात याव्यात असा प्रस्ताव प्रणव सावंत यांनी मांडला .या चर्चेला उत्तर देताना ज्योती गायकवाड म्हणाल्या सातारा आगाराला नव्या स्वरूपाच्या बसेस तत्काळ मिळाव्यात याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मध्यवर्ती परिवहनं विभागाच्या वतीने प्रत्येक आगाराला कमीत कमी दहा बसेस मिळतील अशी अपेक्षा आहे. 

विभाग नियंत्रक या नात्याने नफ्यातील बस सेवां मार्गांचे पुनरुज्जीवन करणे,यंत्र विभागाचे अद्यावतीकरण करणे, सातारा शहर बस आगार स्थलांतरणाच्या कृती आराखडा तयार करणे, सातारा आगारातील मध्यवर्ती फलाटांचे सौंदर्यीकरण वाढवणे, याबाबत तातडीने सुविधा पुरविण्यात येतील असे आश्वासन गायकवाड यांनी दिले .बसेसची उपलब्धता झाल्यानंतर सातारा शहरात लगतचे ग्रामीण भागातील फायद्यातील रूट तात्काळ सुरू करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मंजुरीसाठी पंचवीस हजार मागणारा झेडपीतला साहेब कोण ? ; शिक्षण विभागामध्ये अनेक जण टाचा घासून घाईला, शिक्षणाधिकाऱ्यांचे हात वर

संबंधित बातम्या