सातारा : कृष्णानगर येथील पाटबंधारे विभागाच्या अधीक्षकाच्या घरातील दागिन्यांवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे.सचिन हणमंत सूर्यवंशी असं त्या अभियंत्याचं नाव असून अज्ञात चोरट्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कृष्णानगर येथील चाहूर कॉलनी मध्ये असलेल्या लुबीना बंगल्याचे गेट आणि सेफ्टी डोअर ची कडी कट करून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी चार ते रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.चोरट्यांनी घरातून २५ हजार किंमतीचे दीड तोळे सोन्याचे गंठण,७ हजार ५०० किमतीचे अर्धा तोळ्याचे कानातील झुमके, ७ हजार ५०० किमतीचे अर्धा तोळ्याचे कानातील वेल, २५ हजार रोख रक्कम असा एकूण ६२ हजार ५०० रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे.
तसेच चोरांनी कपाटात असलेले बँकेचे एटीएम ,पासबुक लायसन्स,पाटबंधारे विभागातील ऑफिशियल कागदपत्रे घेऊन गेले आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस कॉन्स्टेबल भोंडवे करत आहेत.