कोल्हापूर : पुनित बालन स्टुडिओनिर्मित ‘रानटी’ हा मराठीतील सर्वात मोठा अॅक्शनपट येत आहे. शुक्रवारी (दि.22) प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास अभिनेता संतोष जुवेकर यांनी व्यक्त केला.
जुवेकर यांच्यासह या चित्रपटातील कलाकार नागेश भोसले, जयवंत वाडकर यांनी मिडियाशी संवाद साधत ‘रानटी’ चित्रपटाचा प्रवास उलगडला. जुवेकर म्हणाले, याआधीही अॅक्शन फिल्म्स खूप आल्या. पण, काळानुरूप गोष्टी बदलत गेल्या आणि तलवार, कुर्हाडी ऐवजी बंदुक, कट्टे आले. अॅक्शनपटाची दिशा बदलली. मराठी चित्रपट ‘रानटी’मधील अॅक्शन प्रकार वेगळा आहे. या अॅक्शन प्रेक्षकांनाही आवडतील. मराठीत साऊथसारखे अॅक्शन सिनेमे आलेले नाहीत. पण, येऊ घातलेला हा चित्रपट सिनेरसिकांच्या मनावर नक्कीच रुंजी घालेल.
मुख्य अभिनेता शरद केळकर आणि समित कक्कड यांनी खूप वर्षे काम केलं आहे. अखेर या चित्रपटाची कथा पुनित बालन यांना आवडली आणि त्यांनी चित्रपटाला होकार दिला. उत्तम मराठी सिनेमे आपणही आणू शकतो. हा मराठी सिनेमा लोकांना नक्कीच आवडेल, असेही त्यांनी सांगितले. वाडकर म्हणाले, पुनित बालन यांनी चित्रपट, वेबसीरिज केले. आता त्यांनी अॅक्शन चित्रपट आणण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे. अभिनेते संजय नार्वेकर यांनी साकारलेली खलनायिकाची भूमिका ही खूप उत्तम साकारली आहे. उत्तम संगीत, उत्तम फाईट अॅक्शन्ससाठी अनुभवी आणि तज्ज्ञांनी रात्रं-दिवस काम केल्याचे ते म्हणाले.
शरद आणि समित यांच्याकडे ही स्क्रीप्ट 5 वर्षांपासून होती. पण, स्क्रीप्टसाठी लागणारी गुंतवणूक करणारा निर्माता मिळत नव्हता. निर्माते पुनित बालन यांनी या सिनेमाची पूर्ण प्रोसेस समजून घेतली. त्यांनी सिनेमाची उत्तम जाण असल्याने त्यांनी हा सिनेमा हाती घेतला. मराठीत एक नवा ट्रेंड सेटर सिनेमा येत असेल, तर आपण त्यात वाटा उचलला पाहिजे, या भूमिकेतून त्यांनी हा सिनेमा हाती घेतला, अशा शब्दात संतोष जुवेकर यांनी निर्माते बालन यांचे कौतुक केले.
‘रानटी’च्या कलाकारांनी टोमॅटो एफएमला भेट दिली. सर्व कलाकारांचे स्वागत करण्यात आले. यानंतर कलाकारांनी टोमॅटो एफएमवरून चित्रपटाविषयी प्रेक्षकांशी संवाद साधला.
दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन पाहावा, असे आवाहन सर्व कलाकारांनी केले. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीला सुद्धा अँग्री यंग मॅन अॅक्शन हिरो मिळाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |
जीवन परिवर्तनात पुस्तकांची भूमिका मोलाची |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
‘मानिनी जत्रा’ सारखे उपक्रम बचतगटांसाठी नवसंजीवनी |
आई, मी 1000 सूर्यनमस्कार पुर्ण केले..!’ |
डिजिटल नकाशे म्हणजे मालमत्तेचे वैध पुरावे |
जिल्ह्यात पुन्हा एकदा ''शंभूराज" |