सातारा : शेंद्रे येथे अज्ञात चोरट्यांनी सुमारे दोन लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 ते 30 दरम्यान शेंद्रे (भोसले वस्ती), ता. सातारा येथील दिलीप बबन भोसले यांच्या राहत्या घरातील लोखंडी कपाटातील लॉकर मधील ठेवलेले एक लाख 87 हजार 680 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरून नेले आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरडे करीत आहेत.