सातारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू कौल; भाजपसह इतर सत्तास्थापनेच्या हालचाली; राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना शिंदे गट एकत्र येणार ? महायुतीमधील नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष

सातारा जिल्हा परिषद पक्षीय बलाबल भाजपा २६, राष्ट्रवादी २२, शिवसेना १५, काँग्रेस एक, अपक्ष एक

by Team Satara Today | published on : 09 February 2026


सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. जिल्ह्यात एकूण ६५ जिल्हा परिषद गटांपैकी भाजप २७, राष्ट्रवादी काँग्रेस २१, शिवसेना (शिंदे गट) १४, काँग्रेस १ आणि इतर २ पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सर्वच पक्षांसमोर सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे.

सत्ता स्थापनेच्या बहुमताचा आकडा हा ३३ आहे भाजप सर्वाधिक जागा मिळवूनही बहुमतापासून दूर राहिला असून, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. या दोन पक्षांची एकत्रित संख्या ३५ होत असल्याने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेले बहुमत सहज पूर्ण होत आहे.

दरम्यान, या सत्तास्थापनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन काका पाटील, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जिल्ह्यातील राजकीय निर्णयांवर या नेत्यांचा प्रभाव असल्याने त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी काय पावले उचलली जाणार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले  ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे खासदार उदयनराजे भोसले भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले हे काय निर्णय घेणार, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्याची आकडेमोड पाहता राष्ट्रवादी–शिवसेना शिंदे गटाची आघाडी अधिक मजबूत दिसत आहे. येत्या काही तासांत किंवा दिवसांत जिल्हा परिषदेत सत्ता कोणाच्या हाती जाणार, याचे चित्र स्पष्ट होणार असून सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिल्ह्यात भाजपाचे सर्वाधिक आमदार  व दोन मंत्री असल्याने जिल्हा परिषद जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता येणार हे निश्चित होते. मात्र राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर भाजपाला सत्तेपासून रोखण्यात यश मिळविले. अतिशय काटेकोर नियोजन आणि चिवटपणे प्रचार करून या पक्षाने २१ जागी विजय मिळवला.

शिवसेना शिंदे पक्षानेही १५ जागा जिंकल्या.

छोटी (मिनी)विधानसभा म्हणून ओळख असणाऱ्या या निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी मतदार संघातील सर्वाधिक जागा जिंकून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा धक्का बसला. त्यांचे चुलत बंधू अरुण गोरे आणि त्यांच्या वहिनी भारती अंकुश गोरे हे पराभूत झाले. तर जयकुमार गोरेंच्या दुसऱ्या वहिनी सोनल शेखर गोरे या विजयी झाल्या.जिल्हा परिषद तीन राष्ट्रवादी दोन जागा जिंकल्या तर   पाच  पंचायत समितीच्या पाच जागा जिंकून जयकुमार गोरे यांचा वारू रोखला. मागील चार वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले माजी आमदार भाऊसाहेब गुदगे यांचे चिरंजीव राष्ट्रवादीचे सुरेंद्र गुदगे यांचा पराभव झाला आहे.या निवडणुकीने कराड उत्तरचे आमदार

आ.मनोज घोरपडे यांनाही धक्का बसला.पाटण मध्ये भाजपाचे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी  प्राची नरेंद्र पाटील यांचा पराभव झाला. शिवसेनेच्या २२ वर्षाच्या मृणाल महेश पाटील यांनी त्यांचा पराभव केला. मृणाल पाटील या सर्वात कमी वयाच्या जिल्हा परिषद सदस्य झाल्या आहेत.

पाटण येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपले मतदारसंघांमध्ये वर्चस्व कायम राखले आहे.

या निवडणुकीने विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाचा मागील पराभवानंतर फलटणमध्ये पुनर्जन्म झाला आहे. त्यांच्या शिवसेना शिंदे पक्षाच्या पाच जागा निवडून आल्या आहेत. वाई खंडाळा महाबळेश्वर मतदार संघात मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. मतदारसंघातील नऊपैकी सहा जागा त्यांनी जिंकले आहेत त्याचबरोबर वाई खंडाळा महाबळेश्वर पंचायत समितीची सत्ता ही त्यांनी मिळवली आहे.

या निवडणुकीत कोरेगाव खटाव शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे या भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. मात्र त्यांच्या मतदारसंघातील दोन सदस्य शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले आहेत. 

एकूणच या निवडणुकीत भाजपाने सत्ता मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मोठ्या प्रमाणात पैशाच्या बाळाचा वापर  पक्षांकडून झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील सर्व भागात तालुक्यात व विधानसभा मतदारसंघात आपली ताकद असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी शरद पवार पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती मात्र त्यांना सहा जागी पराभव पत्करावा लागला.


सातारा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार जागी भाजपा आणि दोन जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत.कोरेगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी तीन, शिवसेना दोन, भाजप एक जागा जिंकल्या आहे. माण तालुक्यात राष्ट्रवादीने तीन आणि भाजपाने दोन जागा जिंकल्या आहेत. खटाव तालुक्यात भाजपने चार, आणि राष्ट्रवादीने तीन जागा जिंकल्या आहेत. जावळी येथे शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपाने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. फलटण येथे शिवसेनेने पाच, भाजपा दोन आणि राष्ट्रवादीने एक जागा घेतली आहे. पाटण येथे शिवसेना सहा आणि भाजपाने एक जिल्हा परिषद गट जिंकला आहे. वाई खंडाळा आणि महाबळेश्वर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने सहा, शिवसेना एक आणि भाजपाने दोन जागा मिळविल्या आहेत.


या निवडणुकीत औंध (ता खटाव) गटातून  वाहिनी भाजपच्या भारती अंकुश गोरे यांचा पराभव झाला असून राष्ट्रवादीच्या मनीषा फडतरे विजयी आले आहेत.

कुकुडवाड(ता माण)गटातून भाजपाचे अरुण गोरे यांचा पराभव झाला असून सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देसाई यांचा विजय झाला.मायणी जिल्हापरिषद गटाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲड सुरज शिवाजीराव पाटील, यांचा दोन्ही पंचायत समितीच्या उमेदवारांसह  विजयी झाले 

मार्डी या जिल्हा परिषद गटात सख्या जावा निवडणूक लढवत होत्या. यामध्ये भाजपच्या भारती पोळ यांचा पराभव राष्ट्रवादीच्या सोनाली पोळ विजयी झाल्या झाल्या आहेत.सातारा खेड गटातुन राष्ट्रवादीचे कामेश कांबळे, कोडोली गटातुन भाजपच्या नीता खरात,कारी गटातून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सहकारी भाजपचे राजुभैय्या भोसले,वर्णे गटात राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राजु शेळके, कोरेगाव कुमठे जिल्हा परिषद गट राजाभाऊ जगदाळे, पाटखळं गटातून राष्ट्रवादीच्या शुभांगी जाधव,लिंब  गटातुन भाजपचे सर्जेराव सावंत, महाबळेश्वर तळदेव गटातून शिवसेनेचे अजय सपकाळ, वाईच्या ओझर्डे गटातून वृषाली चव्हाण, यशवंत नगर गटा तून दिनकर शिंदे, बावधन बावधन राष्ट्रवादीच्या गटातून ऋतुजा विराज शिंदे, भुईंज गटातून दिलीप बाबर भाजपचे विजयी झाले आहेत. याबरोबरच मदन भोसले यांच्या कन्या सुरभी भोसले भुईंज पंचायत समिती गणातून विजयी झाल्या आहेत. रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांचे चिरंजीव स्वप्निल गायकवाड भाजपाच्या चिन्हावर पंचायत समिती पसरणी गणातून विजयी झाले आहेत.

राष्ट्रवादी,  कुमठे गण स्वाती जाधव राष्ट्रवादी,

ल्हासुर्णे गण रुपाली शिवाजी गुरव राष्ट्रवादी विजयी.

एकंबे गटात राष्ट्रवादीच्या राजेश्वरी भोसले विजयी 

वाई तालुक्यात जि.प. चार पैकी तीन  व पंचायत समिती आठ पैकी पाच जागा राष्ट्रवादी पक्षाला मिळाल्या आहेत.खंडाळा तालुक्यात जि.प. तीन पैकी दोन व पंचायत समिती सहा पैकी चार जागा राष्ट्रवादी पक्षाला मिळाल्या आहेत. महाबळेश्वर तालुक्यात जि.प च्या दोन पैकी एक राष्ट्रवादी व एक शिवसेना शिंदे पक्ष पंचायत समिती चार पैकी दोन जागा राष्ट्रवादी पक्षाला दोन जागा शिवसेना शिंदे पक्षाला मिळाल्या आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रक्षक प्रतिष्ठानचे सदरबझार जनसंपर्क कार्यालय सुरू; प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोझर यांच्या हस्ते उद्घाटन
पुढील बातमी
सातारा तालुक्यात राजे गटाचा करिष्मा पण राष्ट्रवादीचे हादरे; पाटखळ व खेड गटात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी; आ महेश शिंदे यांना सेटबॅक

संबंधित बातम्या