शिष्यवृत्तीकरीता पात्र विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीने फी वसूल केल्यास महाविद्यालयांवर गुन्हा

समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनिल जाधव यांच्या सूचना

by Team Satara Today | published on : 30 June 2025


सातारा : सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक-इबीसी-२००३/प्र.क्र.३०१/मावक-२ दिनांक-१ नोव्हेंबर, २००३ अन्वये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसूल करू नये, तसे आढळल्यास संबंधित महाविद्यालय विरोधात फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयांना याबाबत वेळोवेळी सूचित करण्यात आले आहे. तरीही काही महाविद्यालयांकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेल्या व शिष्यवृत्तीकरीता पात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून फी वसूलीबाबत कोणत्याही तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित महाविद्यालय विरोधात फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशा सूचना सातारचे समाज कल्याण सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी केल्या आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना मजबूत करावी
पुढील बातमी
प्रधानमंत्री योजनांच्या लाभासाठी बँकांनी अभियान राबवावे : जिल्हाधिकारी संतोष पाटील

संबंधित बातम्या