सातारा : सातारा शहरातील पंताचा गोट परिसरात राहणारे रुपेश चंदक्रांत पवार (वय ३९) हे कामानिमित्त पाटण येथे जावून येतो, असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही कोणताही ठावठिकाणा न लागल्याने अखेर सातारा शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सातारा शहरातील पंताचा गोट परिसरातील तरुण बेपत्ता
by Team Satara Today | published on : 14 January 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा