जिल्ह्याचे नामकरण राजधानी सातारा करण्याची शिवसेनेची मागणी

by Team Satara Today | published on : 13 July 2025


सातारा : सातारा जिल्हा हा मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोघांच्याही पदस्पर्शाने पावन झालेला, त्याग, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक आहे. या सातारा जिल्ह्याचे नाव राजधानी सातारा करावे, अशी मागणी सातारा जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीने अधिकृतरित्या करण्यात आलेली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले हिंदवी स्वराज्य आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या बलिदानातून जो इतिहास घडला,  त्यामुळे साताऱ्याचे "राजधानी सातारा" असे नामकरण व्हावे. यासाठी व केंद्र राज्य सरकारने पाठपुरावा करण्याची मागणी शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले व चंद्रकांत जाधव यांच्यासह मान्यवरांनी केली आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदन सादर केले.

सातारा जिल्ह्यातील सामान्य जनता, शिवसैनिक व विविध सामाजिक संस्थानीही राजधानी सातारा असा उल्लेख करण्यास सुरुवात केली आहे. या प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र पूर्तता सातारा जिल्हा प्रशासनामार्फत केंद्र शासनाकडे सादर होईलच, पण त्यासाठी सातारा जिल्ह्याचे सुपुत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मान्यवरांचे पाठबळ अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रस्तावाला सहकार्य लाभल्यास हे नामकरण नक्कीच शक्य होईल. या ऐतिहासिक नामकरण कार्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आलेली आहे. 

यावेळी सातारा शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीतसिंह भोसले, चंद्रकांत जाधव, प्रदीप माने, वासुदेव माने,  संभाजी पाटील, योगेश फाळके, निलेश मोरे, नवनाथ पाटील, राजु केंजळे इत्यादी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फक्त 99 रुपयात अक्षरगणेशा रेखाटून घेण्याची सुवर्णसंधी
पुढील बातमी
सातारा शहरातील गणेश मंडळांची बैठक

संबंधित बातम्या