सातारा : तब्बल चार वर्षाच्या प्रशासकीय राजवटीची अखेर करत नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी सभागृहाच्या शानदार सोहळ्यात नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला .सातारा शहराच्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांसाठी महत्त्वाचे प्रस्ताव सादर करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांनी करत आगामी निवडणुका या सातारा शहरात महानगरपालिकेसाठी होतील असे संकेत दिले .तर पुढील पाच महिन्यात सातारा नगरपालिका सदर बाजार कॅम्प येथील पालिकेच्या नवीन इमारतीत स्थलांतरित होईल अशी घोषणा उदयनराजे यांनी केली .
मनोमिलनाच्या दोन्ही शिलेदारांनी सातारा शहराच्या विकासासाठी आम्ही दोघे कोठेही कमी पडणार नाही सर्व नगरसेवकांनी सातारा शहरातील नागरिकांच्या आशा आकांक्षा समजावून घेत त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यातअसा सल्ला नूतन नगरसेवकांना दिला .या कार्यक्रमसोहळ्यामध्ये मुख्याधिकारी विनोद जळक यांनी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याकडे लोकनियुक्त नगराध्यक्षम्हणून त्यांच्याकडे पदभार हस्तांतरित केला .या तांत्रिक प्रक्रियेनंतर खासदार उदयनराजे व शिवेंद्रसिंह राजे या दोन्ही नेत्यांनी अमोल मोहिते यांना त्यांच्या धरणातील नगराध्यक्षपदाच्या खुर्चीत बसून आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .यावेळी अमोल मोहिते यांनी दोन्ही महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली सोमवारी पहिल्या प्रशासकीय सर्वसाधारण सभेची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे .या सभेमध्ये उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड केली जाईल असा अंदाज आहे .
तत्पूर्वी झालेल्या पदग्रहण सोहळ्यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली .सर्व मतदार बंधू सर्व नगरसेवक व मनोमिलनाचे दोन्ही राजे या सर्वांचे अमूल मोहिते यांनी मनापासून आभार मानले .सातारा पालिकेचे प्रशासन पारदर्शी निष्पक्ष आणि लोकांच्या हिताला प्राधान्य देणारे राहील सातारकरांच्या हिताचा आणि त्यांच्या अपेक्षांना खरा उतरेल असा कारभार करून दाखवू फार बोलणार नाही प्रत्यक्ष कृतीच बोलेल अशा मोजक्या शब्दांमध्ये अमोल मोहिते व्यक्त झाले .
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी नूतन नगरसेवकांना फक्त प्रभागाचे न बघता शहराच्या विकासाचे बघा असा थेट सल्ला दिला .तसेच सातारा शहराच्या पाच वर्षानंतरच्या पुढील निवडणुका या नगरपालिकेच्या नाही तर महानगरपालिकेच्या होतील त्यासाठी आवश्यक संख्याबळ पायाभूत सुविधांचा विकास सातारा शहराची चौफेर रचना या दृष्टीने आपल्याला येत्या पाच वर्षात काम करावे लागेल .जे प्रकल्प मार्गी लागले त्यांची देखभाल दुरुस्ती आणि आगामी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी तातडीने राज्य शासनाकडे तांत्रिक तपशीलासह प्रस्ताव तातडीने दाखल करा राज्य शासनाचे अंदाजपत्रक येत्या 25 फेब्रुवारी पर्यंत सादर होण्याची शक्यता आहे या अंदाजपत्रकामध्ये विकास कामांसाठी तरतूद केली जाईल असा शब्द त्यांनी दिला .तसेच अपक्ष उमेदवारांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला त्यांनी सुद्धा मनात कोणतीही शंका न आणता काम करत राहावे सातारा शहरातील एकूण 50 नगरसेवकांना बरोबर घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे .सर्व अपक्ष नगरसेवकांच्या प्रभागाना निश्चितपणे न्याय दिला जाईल असे आश्वासन क्षेत्र सिंहराजे यांनी दिले
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आल्यानंतर येथे जुन्या आठवणींना उजाळा मिळतो 1991 साली याच सभागृहातून माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली होती .मी व शिवेंद्रसिंहराजे भोसले सातारा शहराच्या विकासात आम्ही कोठेही कमी पडणार नाही .केंद्राकडून व राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील .केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे भाजप हा राज्यातील तसेच देशातील सर्वात मोठा पक्ष आहे सातारा शहरासाठी आपण जास्तीत जास्त निधीच्या माध्यमातून शहराची चौफेर प्रगती घडू यासाठी आपण विकासाचे प्रकल्प आपल्या विकासाच्या संकल्पना आमच्याकडे थेटपणे मांडाव्यात असे आवाहन उदयनराजे यांनी केले .येत्या एप्रिल पर्यंत सातारा नगरपालिका ही कॅम्प सदर बाजार येथील नवीन वास्तूमध्ये स्थलांतरित होईल असे आश्वासन त्यांनी दिले .नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील आपल्याला मतदान न केलेल्या नागरिकांना सुद्धा दुजाभाव न करता एकत्रपणे घेऊन जात त्यांच्यासुविधांचा जरूर विचार करावा अशी महत्त्वपूर्ण सूचना उदयनराजे यांनी केली .आत्ताच मी एडवोकेट दत्ता बनकर यांच्याशी बोललो तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी माझे नाव कुठे ऍडजेस्ट करता येईल तर बघा अशी मिश्किली उदयनराजे यांनी केली .