नरेंद्र महाराजांच्या अनुयायांचे धरणे आंदोलन

कॉंग्रेस नेत्यांच्या वक्तव्याचा केला निषेध

by Team Satara Today | published on : 24 February 2025


सातारा : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या विषयी केलेल्या आपमानास्पद वक्तव्याचा सातारा जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या समोर नरेंद्र महाराजांचे शिष्य व अनुयायी यांनी जोरदार घोषणा देत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

श्री संप्रदाय सातारा जिल्हा सेवा समिती यांच्या नेतृत्वात आंदोलनकर्त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अनेकांनी हातात पोस्टर आणि फलक घेत निषेध नोंदवला. यावेळी सातारा जिल्हा सेवा समिती तसेच जिल्ह्यातील सर्व भक्त, शिष्य, अनुयायी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

महाराजांचा अवमान करणार्‍या या भ्रष्ट आमदाराने माफी मागावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. अन्यथा होणारे परिणाम हे अतिशय गंभीर स्वरूपाचे असतील. त्याला सर्वस्वी जबाबदार कॉंग्रेस पक्ष व भ्रष्ट आमदार विजय वडेट्टीवर राहतील, असा इशारा देण्यात आला.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा परिषद लघु पाटबंधारेच्या अभियंत्याला पाठवले सक्तीच्या रजेवर
पुढील बातमी
जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी संतोष नलावडे यांचे अपघाती निधन

संबंधित बातम्या