सातारा : आपापसात मारामारी करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झेडपी चौक ते कनिष्ठ मंगल कार्यालय रस्त्यावर आपापसात मारामारी करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी अवधूत अरुण कुमार सकटे ( रा. केबीपी होस्टेल सातारा), अजिंक्य अनिल ढाणे (रा. शाहूनगर सातारा), धीरज फडतरे (रा. सातारा), निहाल अनंत पवार (रा. मंगळवार पेठ, सातारा) यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.