सातारा : गोडोली सातारा येथे अज्ञात चोरट्याने दोन ठिकाणी घरफोडी करून सुमारे 51 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 ते 12 ऑगस्ट दरम्यान विजय विष्णू फाटक रा. विलासपूर, गोडोली, सातारा यांच्या राहत्या घराच्या खिडकीचे ग्रील तोडून अज्ञात चोरट्याने घरातील 40 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. तसेच तेथीलच शुभांगी दत्तात्रय महामुनी यांचे बारा हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार पोळ करीत आहेत.
गोडोलीत सुमारे 51 हजारांची घरफोडी
by Team Satara Today | published on : 14 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा