विकास नगर येथून दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 10 December 2024


सातारा : विकास नगर येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 रोजी पहाटे 4 ते सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान बबन देवकुळे रा. विकास नगर, सातारा यांची राहत्या घरासमोर पार्क केलेली दुचाकी क्रमांक एमएच 11 डीई 8530 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जाचहाट प्रकरणी चार जणांवर गुन्हा
पुढील बातमी
कोरेगावला मतदान जागृती स्पर्धांमध्ये संतोष राऊत, विद्या उकिर्डे, नंदिनी जमदाडे प्रथम!

संबंधित बातम्या