साताऱ्यात खंडणीसह मालमत्तेचे केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 10 November 2025


सातारा : खंडणीसह एकाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ६ ते ८ दरम्यान शंभू जगन्नाथ भोसले (रा. अमरलक्ष्मी, कोडोली, सातारा) यांना १५ हजार रुपये खंडणी मागून, धमकी देऊन त्यांच्या अजंठा चौक सातारा येथील शिवशंभो आईस्क्रीम पार्लर व चहा नाष्ट्याच्या दुकानाला आग लावून सुमारे दोन लाखांचे नुकसान केल्याप्रकरणी दाद्या पवार व सुजल जाधव यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सावंजी करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाईचे माजी नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश; जिल्ह्यात पक्ष बळकट करण्याच्या दिशेने मोठे पाऊल
पुढील बातमी
परवानगी न घेता आदेशाचे उल्लंघनप्रकरणी सर्कस व्यवस्थापकावर गुन्हा

संबंधित बातम्या