09:13pm | Sep 21, 2023 |
सातारा : विडणी, ता. फलटण येथील नीरा उजव्या कालव्यात हातपाय दोरीने बांधून सापडलेल्या युवकाच्या खुनाचा उलगडा फलटण पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी युवकाची पत्नी, तिच्या प्रियकरासह एकास अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 19 सप्टेंबर रोजी विडणी, ता. फलटण हद्दीत असणार्या नीरा उजव्या कालव्यामध्ये हातपाय दोरीने बांधलेल्या अवस्थेमध्ये एका युवकाचा मृतदेह पोलिसांना मिळून आला होता. हातपाय बांधले असल्यामुळे हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यादृष्टीने फलटण ग्रामीण पोलिसांनी तपास सुरु केला होता.
त्यानुसार दि. 17 सप्टेंबर रोजी सिद्धनाथ गणेश तरुण मंडळ, शिवाजीनगर, फलटण येथील अजित पोपट बुरुंगले वय 24 या युवकाच्या मिसिंगची तक्रारही फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या मिसिंग तक्रारीच्या आधारे फलटण ग्रामीण पोलिसांनी पडताळणी केली असता विडणी हद्दीमध्ये मिळून आलेला मृतदेह व मिसिंग असलेला तरुण एकच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यानुसार अधिक तपास केला असता मयत अजित पोपट बुरुंगले याची पत्नी व थेऊर (केसनन, पुणे) येथील करण विठ्ठल भोसले यांचे अनैतिक संबंध होते. या प्रेमसंबंधास व दोघांना लग्न करण्यासाठी पती अजित याचा अडथळा होत असल्याने संशयित करण भोसले व त्याचा मित्र राहुल उत्तम इंगवले वय 22, रा. लोहमार्ग रोड, वाघोली, पुणे या दोघांनी मिळून मृत अजित याच्या पत्नीच्या सांगण्यावरुन मृत अजित बुरुंगले यास मोबाईलद्वारे संपर्क साधून त्याला घराच्या बाहेर बोलवले व त्याचे हातपाय दोरीने बांधून त्याचा गळा आवळून खून केला. तसेच पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह फलटण येथील नीरा उजवा कालव्यामध्ये टाकून दिला. याची कबुलीही संशयितांनी दिली असून याप्रकरणी पोलिसांनी मृत अजित याच्या पत्नीसह करण विठ्ठल भोसले आणि राहुल उत्तम इंगवले यांना अटक केली असून याबाबतचा अधिक तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल शेळके करीत आहेत.
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
सफाई मजदूर कॉंग्रेसची जिल्हा रुग्णालयात गांधीगिरी |
साताऱ्यात अंगणवाडी सेविकांची निदर्शने |
भाजपा कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष |
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला जिल्ह्यातील मतदार नोंदणीसह विविध विषयांचा आढावा |
सातारच्या श्लोक घोरपडेने रोवला मानाचा तुरा |