सातारा : सातार्यातील सिव्हील हॉस्पिटल येथे दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात २० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस हिरालाल पवार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सुनील खवले, अशाेक पिटेकर, सुरज गायकवाड, अनिल खवळे, अशोक खवळे, सागर खवळे, अर्जुन खवळे, राहूल जाधव, राजू जाधव, सनी जाधव, अर्जुन खवळे, विकी खवळे, विनोद जाधव, गोरख दांडे (रा. नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. १७ सप्टेबर रोजी सांयकाळी ७.३० वाजता सिव्हीलमध्ये घडली आहे. संशयितांनी एकमेकांना गचुंड्या धरुन लाकडी दांडके, दगड फेकून एकमेकांना मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.